प्रतिनिधी , सदर बाजार : आशाबाई कडुबा सरकटे रा. साईनगर यांच्या घरावर अज्ञात लोकांनी 27 जानेवारीला हमला करून सदर महिलेच्या घरातील मुद्देमाल पूर्णच्या पूर्ण संसारोपयोगी साहित्य पूर्ण ट्रकमध्ये भरून गेलेलं होतं आणि या लोकांना सुद्धा त्यांच्या घरामध्ये डांबून ठेवलं होतं अशा तक्रार सदर बाजार पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आली होती, या तक्रारीची तातडीने दखल घेत तपास केला असता मुख्य आरोपीला अटक केलेला आहे आणि आरोपी कडं साहित्य जवळपास दहा लाख 30 हजार साहित्य जप्त केलेला आहे आणि आरोपींनी आणखी कुठेकुठे चोर्या दरोडे घातले तर याकरिता आरोपींचा पीसीआर घेतलेला आहे व पुढील तपास करत आहोत अशा प्रकारची घटना कुठे होत असतील कोणी आपल्या परिसरामध्ये दादागिरी करत असेल गुंडगिरी करत असेल तर निश्चितच पोलिसांना त्याची माहिती द्या त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आवाहन सदर बाजार पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.
