प्रतिनिधी , जालना : पोलीस ठाणे कदिम जालना येथील फिर्यादी आनंत गणपतराव जोशी
रा.आनंदवाडी कालनी नुतनवसाहत जुना जालना यांचे फिर्यादी वरुन पोलीस ठाणे कदिम येथे
2,50,000/-रुपये किंमतीची एक बोलेरो गाडी क्रं. MH-21-V-1968 हि चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती
सदर गुन्हयाचा तपास पोको अंभोरे करीत होते. मा.पोनि प्रशांत महाजन
व डी.बी.पथकास गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली कि,पोलीस ठाणे कदिम
जालना येथील गुन्हा रजि.नं.34/2021 कलम 379 भादवीच्या गुन्हयातील अज्ञात फरार
आरोपी नामे राहुल राधेशाम वाघमारे वय 22 वर्षे रा.पारशी गल्ली काद्राबाद नवा जालना
हा गुन्हयात सामिल आहे त्यावरुन पोलिस ठाणे कदिम जालना डी.बी.पथकास
मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपीस ताब्यात घेतलेत्यास त्यास विचार पुस केली आसता त्याने गुन्हयाची कबूली दिली असून पोलीस ठाणे कदिम यांनी गाडी तब्यात घेतलीआसून आरोपीस कार्टात हजर करण्यात आले आहे
सदरची कार्यवाही.पोलीस अधिक्षक श्री.विनायक देशमुख
.अपर पोलीस अधिक्षक जालना श्री. विक्रांत देशमुख उपविभागीय पोलीस
अधिकारी . श्री. सुधीर खिरडकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.प्रशांत
महाजन, पोना. मनोज हिवाळे, पोना. संतोष अंभोरे, पोको. किरण चेके, पोकों.
बाबा गायकवाड,पोको. रामेश्वर राऊत,पोकॉ. कैलास चेके, पोको. कांगणे अशांनी केली
आहे.
