जनतेज न्युज

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविद्यालय तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली

प्रतिनिधी , अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देवगिरी कॉलेज, स्वामी विवेकानंद कॉलेज, सरस्वती भवन कॉलेज, अशा विविध महाविद्यालय तात्काळ सुरू करण्यात यावे असे आंदोलन केले.
कोरो ना संकटामुळे संपूर्ण जगावर विपरीत परिणाम घडून आले त्याचाच परिणाम म्हणून भारतात मार्च दोन हजार वीस पासून टाळेबंदी सुरू करण्यात आली होती या टाळेबंदी मुळे शैक्षणिक व्यवस्थेला मोठा झटका बसला आहे सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव खूप मोठा दिसून येत असून विविध आस्थापने प्रत्यक्षात सुरू झाली आहेत शिक्षण क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालय पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आले आहेत मात्र संपूर्ण महाविद्यालय आज जगात बंदच आहे त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन तसेच शैक्षणिक अडचणींना समोरे जावे लागत आहे ऑनलाइन शिक्षणातून शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चाललेली आहे अनेक विद्यार्थी महाविद्यालयात पुन्हा परत येण्यासाठी प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू होण्याची वाट पाहत आहे महाविद्यालय प्रतीक्षा सुरू करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली