संपूर्ण घरे जळून नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की सुभाषरोड, पवारवाडी या ठिकाणी
प्रतिनिधी , नाशिक : मजूर लोकांची वस्ती आहे. या ठिकाणी दहा घरांची चाळ असलेल्या भागाबाई भगवान खरात या वृद्ध महिलेच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. वृद्ध महिलेच्या मुलीने लागलेल्या आगीची माहिती आपल्या आईला कळवली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करत शेजारी राहणाऱ्या सोनम फराज निकाळजे, रेहना अहमद खान, सुनंदा कांतीलाल लोखंडे, नीलॉफर इस्माईल शेख, सय्यद अली मोहिद्दिन, बेबीबाई अशोक रोकडे, सरोज मोराईस, शहीदा अहमद खान,व सखाराम लक्ष्मण कसबे यांची घरे आगीमध्ये भस्मसात झाली. सर्व घरे लागून असल्याने आग सर्वत्र पसरत होती. त्यामुळे धुराचे व आगीचे लोण दूरपर्यंत दिसत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यंत मिळेल त्या वस्तूने पाणी आणून आग विझवण्याचे प्रयत्न केले. अग्निशामक दलाच्या नाशिकरोड, नाशिक येथील केंद्रातून पाच ते सात आगीच्या बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग जरी आटोक्यात आली असली तरी या मजूर वस्तीमधील पीडित नागरिकांच्या गृह उपयोगी वस्तू, गरजेचे सामान या आगीत भस्मसात होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, स्टेशन अधिकारी अनिल जाधव, जगदीश अहिरे, लिडींग अधिकारी अवी जाधव, सुभाष निकम, कैलास हिंगमिरे, श्रीरंग आदके आदिंनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. घटनेची माहिती मिळताच या भागातील नगरसेवक रमेश धोंगडे यांनी तत्काळ धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, पोलीस, निरीक्षक गणेश न्याहादे, पोलीस हवालदार प्रकाश भालेराव व बीट मार्शल वरील पोलीस कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बघ्यांची गर्दी हटवली
