प्रतिनिधी , जळगाव : शिरपूर व चोपडा तालुक्यातील सीमेवरती ब-हानपूर – अंकलेश्वर हायवे वरील गलंगी या गावी केळी वेफर्स व्यवसाय करून अनेक जण आपला संसार चालवीत आहे. चोपडा शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर शिरपूर आणि चोपडा तालुक्यातील सीमेवरती ब-हानपूर – अंकलेश्वर हायवे वरती गेल्या अनेक वर्षांपासून पंचवीस ते तीस जण केळी वेफर्सचा व्यवसाय करून आपला संसार पुढे चालवीत आहे. या केळी वेफर्स व्यवसायापासून दिवसाला दीड ते दोन हजार रुपये चे विक्री होत असल्याचे या केळी वेफर्स विक्रेते यांनी सांगितले चोपडा तालुक्यात मोठ्याप्रमाणावर केळी पिक घेतले जातात ते शेतकऱ्यांकडून केळीच्या गड विकत घेऊन केळी वेफर्सचा व्यवसाय करीत असल्याचे ही यावेळी सांगितले.केळी व्यवसायामुळे गंलगी गावाला नवीन नावाची ओळख निर्माण होते की काय असे वाटू लागले आहे.
