जनतेज न्युज

सांगलीत शासकीय कर्मचाऱ्यांच्यात रंगला क्रिकेटचा सामना

प्रतिनिधी , सांगली : कोरोना काळात अहोरात्र झटणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना थोडीशी उसंत मिळावी आणि त्यांच्यावरील ताण कमी व्हावा यासाठी सांगली महापालिकेच्या 23 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दोन दिवसीय क्रिकेट सामान्यांचे आयोजन केले आहे.
विशेष म्हणजे ही क्रिकेट स्पर्धा शासकीय कार्यालय विरुद्ध शासकीय कार्यालय अशी घेण्यात आली. यामध्ये महापालिका विरुद्ध जिल्हा परिषद तर पोलीस विभाग विरुद्ध महसूल विभाग यांच्यात क्रिकेटचे सामने घेण्यात आले आहेत. यामध्ये गेली दोन वर्षे महापूर आणि त्यानंतर कोरोना काळात कर्मचारी अधिकारी यांच्यावर कामाचा मोठा तणाव होता. त्यामुळे कोविडच्या संकटातून बाहेर पडलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. याबरोबर महिलांसाठी सुद्धा विविध कार्यक्रम घेतले जाणार आसल्याचे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.