जनतेज न्युज

बिनविरोध निवडून आलेल्या महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण

प्रतिनिधी , बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतच्या महिला सदस्याला मारहाण झाल्याची घटना सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे आज दुपारी घडली आहे. सुमन सातकर असे बिनविरोध निवडून आलेल्या महिला सदस्यांचे नाव आहे. निवडणुकीनंतर ही महिला सदस्य गावातून बेपत्ता होता. परंतु आज ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद निवडीची प्रक्रिया होती. सरपंचपद निवडीच्या सभेला सुरुवात होण्यापूर्वी या बिनविरोध निवडून आलेल्या महिला सदस्य ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दाखल झाल्या. ज्या गावकऱ्यांनी या महिलेला बिनविरोध निवडून आणलं त्यांना हि महिला आपल्या बाजूने मतदान न करता विरोधी बाजूने मतदान करतील की काय या शंका आली असावी. आणि यातूनच गदारोळ होऊन त्या महिलेला मारहाण झाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांनी गदारोळ केल्याने पोलिसांना जास्तीचा फौजफाटा पाचारण करावा लागला.