प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : मोर्चा हाथ जोडून काढला आहे हाथ सोडायला लावू नका ….. मनसेचा इशारा
कोरोनाकाळातील महिन्यामध्ये वाढलेले अवाजवी वीजबिलांमध्ये माफी द्यावी यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. आज कल्याण तलसीदार कार्यालयाबाहेर मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या वेळी ” मोर्चा हाथ जोडून काढला आहे हाथ सोडायला लावू नका ” असा इशारा मनसेच्या वतीने दिला आहे .विशेष म्हणजे मनसेच्या या मोर्चासाठी कल्याण पोलिसांनी परवानगी नाकारली होती तरीही कल्याण डोंबिवली परिसरातून शेकडोच्या संख्येने काळे कपडे घालून मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण स्टेशन ते कल्याण तलसीदार कार्यालया परियात नारेबाजी व ठिय्या आंदोलन करत तलसीदाराणा निवेदन देऊन आंदोलन केले .
