रात्रीपासून तात्काळ बसलेल्या शेतकऱ्यांना जावे लागले परत..
गोंधळ पाहता आता ऑनलाईन होणार नोंदणी…
प्रतिनिधी , बुलडाणा : सोयाबीन, तूर पाठोपाठ आता हरभऱ्याच्या आधारभूत किमतीने खरेदीसाठी हालचाली सुरु झाल्या आहे.नाफेडने हरभरा खरेदीला ग्रीन सिग्नल दिला असून बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात बुधवार पासून हरबरा खरेदी प्रक्रियेसाठी नोंदणीला सुरुवात होणार होती. मात्र नोंदणी केंद्रावर उडालेल्या गोंधळामुळे खरेदी-विक्री संस्थेने नोंदणी स्थगित करून आता ऑनलाईन नोंदणीचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे नोंदणीसाठी रात्रभर ताटकळत बसलेल्या शेतकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे..
बुलढाणा जिल्ह्यात सोमवारपासून हरभरा नोंदणीला सुरुवात झाली आहे. जिल्हा नाफेड मार्फत हि खरेदी होणार असून खरेदी-विक्री संस्था यासाठी मध्यस्थी एजन्सी म्हणून काम पाहत आहे. सध्या हरभऱ्याला पाच हजार शंभर रुपये हमीभाव नाफेड देणार असल्याने शेतकरी हरबरा नोंदणीसाठी गर्दी करीत आहे. यामध्ये शेगाव येथील केंद्रावर आज पासून नोंदणी करण्यात येणार असल्याचे वृत्तपत्राद्वारे शेतकऱ्यांना समजताच रात्री पासून शेतकर्त्यांनी नोंदणी केंद्रावर गर्दी केली. यामध्ये सकाळी खरेदी-विक्री चे कर्मचारी केंद्रावर पोहचले असता नंबर लावण्यावरून शेतकर्त्यांमध्ये वाद झाल्याने नोंदणी करता आली नसल्याचे खरेदी- विक्री संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
