जनतेज न्युज

मी तुम्हाला सलाम करतो ; नितीन गडकरींनी मानले शेतकऱ्यांचे आभार

प्रतिनिधी , मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. देशात सर्वत्र लोक घरात आहेत. परंतु याही स्थितीत देशातील जनतेच्या पोटाची खळगी भरावी यासठी राबलेल्या शेतकऱ्याचे कौतुक व्हायला पाहिजे आणि त्याचे आभार मानले पाहिजे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले आहे.

आपल्या ट्विटरच्या माध्यमातून गडकरी म्हणाले, ‘आज, जर आपण कोरोना संसर्गाची लढाई चांगल्या प्रकारे लढू शकलो आहोत तर त्यामागे आपल्या देशातील अन्नदाता, आपल्या देशातील शेतकरी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यामुळे हे सुनिश्चित केले गेले आहे की आम्ही कधीही भुकेले झोपू नये. मी तुम्हाला सलाम करतो.’ अशा शब्दांत गडकरी यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.