जनतेज न्युज

अमरावती मध्ये आज पासून 36 तास कडक लॉक डाऊन…, ठिकठीकानी पोलिसांची तपास पथके…पोलिस आयुक्त स्वतः गस्तीवर…

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यात आज कोरोणाचा स्फोट झाला आहे ,आज जिल्ह्यात तब्बल 727 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे.गेल्या 10 दिवसात 4413 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे.या भूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाउन घोषित केला आज सायंकाळ 8 वा पासून शहरात लॉक डाऊन ला सुरुवात झाली असून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत राहणार आहे.अमरावती शहरात व हॉटस्पॉट असलेल्या भागात जवळपास 1500 पोलिस कर्मचारी अधिकारी,600 होम गार्ड व एक SRFP ची तुकडी तैनात केली आहे,अमरावतीच्या पोलिस आयुक्त स्वतः डॉ आरती सिंग स्वतः गस्तीवर निघाल्या असून केवळ कारवाई करत नाहीत जनजागृती म्हणून मास्क आणि sanitizer वितरित करत आहेत