प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील कल्याण शीळ रोड उसरघर येथे असलेल्या रुणवालच्या माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज 2 मध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या कामगार वसाहतीला आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. या वसाहतीत कामगारासाठी 120 खोल्या उभारण्यात आल्या होत्या या सर्व खोल्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. आग लागताच कामगारांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र तरीही या आगीत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक कामगार आगीत भाजल्याने गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मयत कामगाराच नाव तपण महालदार असून सुरेश कुमार अस जखमी कामंगराच नाव आहे .दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यानी तातडीने धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले असून प्राथमिक तपासणीत हि आग शोर्ट सर्किटमुळे लागल्या अंदाज व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. या आगीत कामगाराच्या वसाहतीतील सर्व सामानाची राखरांगोळी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कामगारांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
