प्रतिनिधी , जालना : जालना शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्यानं या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने नियम पायदळी तुडवणाऱ्या नागरीक तसेच वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.विदाऊट मास्क वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर तसेच नागरिकांवर आज उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी,तहसीलदार,पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत दंडात्मक कारवाई करण्यात आली.जालना शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्यानं विदाऊट मास्क फिरणारे नागरीक तसेच वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निंर्णय प्रशासनाने घेतलाय.त्या पार्श्वभूमीवर शहरातील चौका-चौकात पोलीसांची पथकं तैनात करण्यात आली असून मास्क न घालणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.दरम्यान नागरीक, वाहनचालकांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावे असं आवाहन उपविभागीय अधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केलंय.
