जनतेज न्युज

ताप आणि सर्दीची औषधे विना प्रिस्क्रिप्शन देऊ नका अन्यथा कारवाई – पालिकेचा मेडिकल असोशिएनला इशारा

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे .कोरोणा चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली. नागरिकांना कोरोनाचे नियम पाळणे सह ,ताप सर्दी खोकला अशी काही लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करून घेण्याचे आव्हान महापालिकेमार्फत करण्यात आलं आहे .याबाबत खाजगी डॉक्टराना ही तापाचे रुग्ण आल्यास तत्काळ चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .मात्र काही नागरिक या आवाहनाला प्रतिसाद देत नसून डॉक्टर कडे जाणे टाळत मेडिकल मधून औषध घेण्यावर नागरिकांचा कल दिसून येत आहे .तर काही मेडिकल स्टोअरमधून देखील विना प्रिस्क्रिप्शन औषध दिले जात आहे .त्यामुळे अनेकदा योग्य उपचार मिळण्यास विलंब होऊन नागरिकांच्या जीवावर बेतत आहे .महापालिकेने याबाबत मेडिकल असोसिएशन ला पत्र पाठवल असून शहरातील कोणत्याही मेडिकल ने बिना प्रिस्क्रिप्शन ताप सर्दी खोकल्याचे औषध नागरिकांना देऊ नयेत , तसेच डॉक्टरांचा सल्ला नंतर आपल्याकडे येणाऱ्या तापाच्या रुग्णांची नोंद ठेवून याबाबत नजीकच्या आरोग्य केंद्रास कळवावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे पत्र मेडिकल असोसिएशनला पाठवलं आहे. तसेच या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी परत काही नेमण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.