प्रतिनिधी , आत्ता पर्यंत आपण धर्मांतरनाचे अनेक कारणे ऐकले व पाहिले असतील मात्र बुलडाण्याच्या धाड मधील एका महिलेचे धर्मांतरन कश्यासाठी करण्यात आले हे ऐकसाल तर थक्क व्हाल,नुकतेच झालेल्या सरपंच निवडणुकीत धाड सरपंच पदासाठी चक्क बनावट धर्मांतरन दाखवून मुस्लिम महिलेने अनुसूचित जागेवर सरपंच पद मिळवले आहे..
धाडच्या सरपंच झालेल्या खातून बी सैय्यद गफ्फार यांना पहिले अनुसूचित जातीची महिला दाखवून नंतर तिचा मुस्लिम धर्मात धर्मांतरन झाल्याचं दाखवीत अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जालण्यातून मिळवलान हा प्रकार करण्यात आल्याचा समोर आला आहे.मात्र अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रसाठी वापरण्यात आलेले सर्व कागदपत्रे बनावटच असल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शी उघड झाले आहे.प्रकरणी बुलडाणा आणि जालना जिल्हा प्रशासनाची व निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याप्रकरणी दोषींवर फसवणूक व ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे जातीचा प्रमाणपत्र बनावट असल्याचे निवडणुकीच्या आधी व निवडणुकीच्या दिवशी बुलडाणा तहसीलदार यांना सांगीतल्यावरही याच महिलेला अनुसूचित जागेवर राजकिय दबावाखाली सरपंच घोषित करण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.
शरद बावस्कर(ग्रामपंचायत सदस्य यांचे पती)
खातून बी सैय्यद गफ्फार यांनी काढलेल्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी सादर केलेले कागदपत्रावरून असे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे की, बाबुराव तुळशिराम लहाने यांची मुलगी भारती बाबुराव लहाने हिने धाड येथील सैयद गफार यांच्या सोबत विवाह करुन त्या भारतीची खातून बी सैयद गफार झाल्या. भारती लहाने यांनी महार जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्या शाळेचे कागदपत्रे जोडली आहेत ज्यात त्यांची जात महार सांगण्या येत आहे,तसेच त्यांचा प्रवेश हा 23 जुलै 1983 रोजी दाखविण्यात आलेला आहे. मुळात त्या ज्या शाळेचा दाखला देत आहेत त्या शाळेची स्थापना ही 1985 मध्ये झालेली आहे. बाबुराव लहाने यांनी जालना तहसील पुरवठा विभाग येथून देण्यात आलेले रेशन कार्ड क्रमांक एसपी 496815 यावर भारती लहाने सोबत अन्य पाच नावे दाखविण्यात आलेली आहे, मुळात या क्रमांकाचे खरे रेशनकार्ड नसीम बी परवेज बाबला रा. जालना यांचे आहे. येवढेच नाही तर सदर महिलेने आपली जन्म तारीख 1 जानेवारी 1977 अशी सांगितली आहे व आपला निकाह हा सैयद गफ्फार यांच्या सोबत 1 एप्रिल 1966 मध्ये झाल्याचा पुरावा दिला आहे, म्हणजे तिचा जन्म निकाह होण्याच्या 10 वर्ष 9 महिने आधीचा आहे.अशी माहिती माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रे नुसार समोर आली असून खातून बी सैय्यद गफार यांनी नामनिर्देशनमध्ये जोडलेल्या पैनकार्डनुसार खातून बी यांचे वडील इब्राहीम खान असून ही खातून बी यांचे वडील बदलून बाबुराव लहाने कसे झाले असा प्रश्न उपस्थित तक्रारकर्ता वाघुर्डे यांनी केला आहे.अनुसूचित जातीच्या आधारे सरपंच झालेल्या खातून बी सैय्यद गफ्फार यांच्या अनुसूचित जातीचा दाखला बनावट असून दाखल्यासाठी दाखल केलेल्या कागदपत्रे बनावट असल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार समोर आले आहे.तर खातून बी सैय्यद गफ्फार यांचा अनुसूचित जातीचा दाखला आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने तयार करण्यासाठी 9970274232 या मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आला आहे.सदर मोबाईल नंबर धाड ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे रिजवान सौदागर यांचे असल्याचे चर्चा आहे.
