नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा,स्टॅम्प घोटाळ्यानं डोकं वर काढलंय.बहुचर्चित तेलगी स्टॅम्प घोटाळ्यानंतर,या घटनेनं पुन्हा एकदा नाशिक चर्चेत आलंय. या प्रकरणी सध्या तरी देवळा तालुक्यात राहणाऱ्या एक स्टॅम्प वेंडर जाळ्यात सापडला असला तरी या मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची माहिती समोर येतेय.देवळा परिसरात राहणारे भास्कर निकम यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर … वडिलोपार्जित जमिनीवर नाव नोंदणी करायला ते गेले .. आणी एक धक्कादायक माहिती उघडकीस आली … त्यांची जमीन ही परस्पर विकली गेल्याचा त्यांच्या लक्षात आलं … चक्क एकाच क्रमांकाच्या 2 स्टॅम्प वर झालेली ही विक्री तिथेच यात काळंबेरं असल्याचं लक्ष्यात आलं … भास्कर निकम यांनी पोलिसात धाव घेत या प्रकरणी तक्रार केली … पोलिसांनी तपास सुरू करताच संशयीत स्टॅम्प वेंडर पसार झाला.अनेक वर्षे कोणताही व्यवहार,नोंद नसलेली जमीन माहिती हा वेंडर तलाठी कार्यालयातून मिळवायचा … बनावट शिक्के आणी बनावट स्टॅम्पचा वापर करून चक्क खोटे खरेदीखत तयार करायचा … आणी त्याची झेरॉक्स प्रत देऊन नोंदणीही करून घ्यायचा … काही दिवसानंतर याच जमिनीचा उतारा घेऊन,दुय्यम निबंधक कार्यालयात, हीच जमीन विक्रीही करायचा … यातूनच तयार व्हायचे,एकाच जमिनीचे 2 कागदपत्र …अखेर याची तपासणी तहसीलदारांनी केली आणि पोलीस तपास गतिमान झाला …दरम्यान, मुद्रांक महासंचालकांनी याची दखल घेत तत्काळ कागदपत्रे घेऊन मुद्रांक कर्मचाऱ्यांना पुण्यात बोलावलं … रस्त्यात नारायणगावात नाश्त्यासाठी थांबलेल्या या कर्मचाऱ्यांच्या गाडीचे काच फोडून चक्क कागदपत्रांची चोरी झाली … आणी यातील संशय अधिक बळकट झाला … तातडीनं मुद्रांक महासंचालकांचं विशेष पथक नाशकात दाखल झालं आणी दुय्यम निबंधकांना निलंबित केलं … याच प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकताय अशी चर्चा आहे … मात्र,जोपर्यंत खरे सूत्रधार म्हणून नाव येत असलेले संशयीत वेंडर पोलीसांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत या घोटाळ्याची खरी व्याप्ती स्पष्ट होणार नाही।।।।।।।।
