जनतेज न्युज

आगामी गणेश उत्सवाच्या पाश्वभुमिवर अकोले तालुका पोलिसांचा रूटमार्च

प्रतिनिधी, अहमदनगर : राजूर पोलीस स्टेशन वतीने आज सकाळी रूटमार्च काढण्यात आला. राजूर पोलीस स्टेशन हद्दीत आगामी गणपती उत्सव अनुशंगाने राजूर गावात रूटमार्च घेण्यात आला. सदर रूटमार्च दरम्यान 1अधिकारी,14 पोलीस अंमलदार, 07 होमगार्ड उपस्थित होते. कायदा व सुवस्थे बाबत पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी म्हणून तसेच आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्सव तसेच ग्रामपंचायत निवडणूक 2022 होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी पोलीस सज्ज असावे या करता माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजुर पोलीस स्टेशन मध्ये रूटमार्च चे आयोजन करण्यात आले होते. राजुर पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रूटमार्ट चे आयोजन करण्यात आले होते व नागरिकांना आम्ही पण आव्हान करतो की ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक कोणी कायद्याचे उल्लंघन करू नये जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल व पोलीस दलाला सहकार्य करावे अशी आव्हान राजुर पोलीसांनी केले आहे.