प्रतिनिधी, ठाणे : लवकरच भविष्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ठाण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील विवियाना मॉलच्या मागे असणाऱ्या ‘नाद’ या निवासस्थानी शरद पवार हे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.. ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या सर्व कार्यकर्त्यांचे प्रश्न हे ऐकून घेत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष स्वतः त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.. सकाळी 11 वाजता शरद पवार हे ठाण्यात दाखल झाले. बैठकीला सुरुवात झाली असून सकाळच्या सत्रात ठाणे ग्रामीण, कल्याण, बदलापूर आणि उल्हासनगर येथील पदाधिकारी यांची भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2 वाजता शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर मिरा – भाईंदर, भिवंडी आणि ठाणे शहर येथील पदाधिकारी यांना भेटून संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुंबईला रवाना होणार आहेत.
