प्रतिनिधी, बुलडाणा : आग्रा येथून छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तूरी देऊन आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर स्वतःसह बालराजे छ. संभाजी महाराजांची सुखरूप सुटका करून घेतली या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेस आज तब्बल 356 वर्ष पुर्ण होत असून, या निमित्ताने “गरूडझेप मोहीमे” अंतर्गत नरवीर पिलाजीराव गोळे हे छ.शिवाजी महाराजांचे पायदळ प्रमुख यांचे तेरावे वंशज अँड. मारूतीराव आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली 300 मावळे हातात “शिवज्योत मशाल” घेऊन ‘आग्रा ते राजगड’ पायी चालत जात आहेत. या मशाल यात्रेचे धुळे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी छ.शिवाजी महाराजांचे पायदळ प्रमुख असलेले नरवीर पिलाजिराव गोळे यांचे तेरावे वंशज अँड. मारूतीराव आबा गोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, छ.शिवाजी महाराजांच्या आग्राचा जो प्रवास झालं तो त्यांच्या जीवनातील सर्वात थरारक, रोमहर्षक आणि स्वराज्याला कलाटणी देणारा हा प्रसंग आहे. त्यामुळे याला उजाळा देण्यासाठी आणि तरुणांना याचे महत्व समजावे म्हणून ही मशाल यात्र आग्रा येथून 17 ऑगस्ट रोजी निघाली असून ती राजगड येथे 13 दिवसांची यात्रा 4 राज्यातून आणि 57 शहरातून जाऊन 29 ऑगस्ट रोजी राजगडावर याची सांगता होणार आहे
