जनतेज न्युज

बैल पोळ्याला चक्क बैलाच्या पाठीवर आ.श्वेता महाले यांचे चित्र

प्रतिनिधी, बुलडाणा : चिखली तालुक्यातील भोगावती येथील युवा शेतकरी सागर लोखंडे यांनी त्यांच्या बैला च्या पाठीवर बैलपोळ्याच्या दिवशी पेंटिंग च्या माध्यमातून अत्यंत कल्पकतेने चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांचे हक्काची माय माऊली या कॅपशन खाली चित्र रेखाटले.. ज्याप्रमाणे बैल हा शेतकऱ्याचा पोशिंदा आहे..तसेच संपूर्ण मतदारसंघाच्या पोशिंदा आमदार श्वेता महाले असून आपल्या विकासात्मक दृष्टीने त्यांनी मतदारसंघाचा विकास केला आहे.. मतदारसंघातील प्रत्येकाच्या घरातील सुखदुःखाच्या प्रसंगी ताई तत्परतेने धावून जातात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण बैलाच्या पाठीवर त्यांची चित्र रेखाटले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.