प्रतिनिधी, नांदेड : कोलंबी येथे ५९ लाखाच्या बोगस सोयाबीन बियाणे ४० लाखाचा ट्रकसह ९९, लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून. बियाणाची बोगसगिरी करणारा भामटा पंडित कच्छवे यांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात 12 जुन रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोलंबी येथील काही जागरूक नागरिकांमुळे बोगस बियाणाचे भांडे फुटले आहे.कोलंबी येथे बोगस सोयाबीन विक्रीसाठी सज्ज असून कोणत्याही क्षणी ट्रक येथे निघतो असा फोन तालुका कृषी अधिकारी सुनील वरपडे यांना रविवारी सकाळी आला. सदरची माहिती मिळताच वरपडे कृषी सहाय्यक इम्रान शेख, पंढरीनाथ गुंडे व समुह सहाय्यक नितीन देगावकर आदिसह कोलंबी गाठली. त्यावेळी एम पी 48 एच 2575 या क्रमांकाचा ट्रक उभा असलेला दिसून आला. या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये ३० कालो वजनाचे सोयाबीन असलेले ६९० पोते होते. त्या पोत्यावर गोदावरी सिडस् अँण्ड बायोटेक, प्लॉट न ९७६ गट न. ५५७ मु.पो. कोलंबी ता. नायगाव खै. असे प्रिंट करण्यात आलेली दिसली.यावरुन सोयाबीनचे बियाणे कंपणी थेट कोलंबी येथेच असल्याचे स्पष्ट झाले पण गोदावरी सिडस् अँण्ड बायोटेक या कंपनीचे कागदपत्रे मागितली असता देण्यास व दाखवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे वरपडे यांनी गुणनियंत्रक बाबासाहेब गिरी यांना माहिती देण्यात आली. गिरी हे कोलंबी येथे दाखल झाले तपासणी केली असता सोयाबीन बियाणे बोगस असल्याचे उघड झाले त्यामुळे ट्रक ताब्यात घेतला व कंपणीला सिल करण्यात आले. ट्रकधील पोत्यासह कंपणीतही मोठ्या प्रमाणात साठा होता.कंपनी चालकास याबाबत कागदपत्रे मागीतली असता टाळाटाळ करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असता. अखेर कृषी अधिकाऱ्यांनी रितसर पंचनामा करुन दि 12 जुन रोजी रविवारी रात्री आठ च्या अंदाजे सदरचा जप्त केलेला ट्रक नायगाव पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी सुनील वरपडे यांनी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन पंडित कच्छवे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून ५९ लाखाचे बोगस सोयाबीनच्या बियाणासह ४० लाखाचा ट्रक असा ९९ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे हे करत आहेत. ऐन पेरणीच्या तोंडावर बोगस बियाणे बाजारात आणण्याचा प्रयत्न काही जागरूक नागरिकामुळे उघड आहे.
