जनतेज न्युज

बनावट दारू बनविणाऱ्या कखान्यावर पोलिसांची धाड

प्रतिनिधी, नागपुर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी एका बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. त्या ठिकाणी डुप्लिकेट देशी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि जवळपास एक लाख रिकाम्या बॉटल तर काही भरलेल्या बॉटल मिळून आल्या याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली.  हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे टीबी पथक रात्री गस्तीवर असताना त्यांना एक संशयित गाडी मिळाली त्या गाडीमध्ये बनावट दारूच्या बॉटल भरलेल्या होत्या. त्याला पकडून चालकाकडून विचारपूस केली असता त्याने हा माल हुडकेश्वर परिसरातील एका कारखान्यातून आणला असून त्या ठिकाणी बनावट दारू बनवल्या जात असल्याचा सांगितलं यावरून पोलिसांनी बनावट दारूच्या कारखान्यावर रात्रीच्या अंधारात धाड टाकली आणि त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली असता पोलीसही थक्क  झाले. बनावट दारू बनविण्यासाठी लागणारे मोठ्या प्रमाणात साहित्य या ठिकाणी उपलब्ध होते सोबतच दारू भरण्यासाठी जवळपास एक लाखाच्या  वर रिकाम्या बॉटल त्या ठिकाणी होत्या तर काही बॉटल्स मध्ये दारू भरलेली होती. पोलिसांनी लगेच उत्पादन शुल्क विभागाला या संदर्भातली माहिती दिली आणि त्या ठिकाणचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार जवळपास महिना दीड महिन्यापासून या ठिकाणी अशा प्रकारची दारू बनविल्या जात असल्याचा पुढे आला पोलीस आता पुढील तपास करत आहे.