जनतेज न्युज

बौद्ध बांधवांनी आषाढी एकादशीनिमित्त केली ‘भीम कोरेगाव ते पंढरपूर’ वारी

प्रतिनिधी , सोलापूर : आज आषाढी एकादशी निमित्ताने पंढपुरात लाखो वैष्णवांचा मेळा जमला आहे. या मेळ्यामध्ये बौद्ध बांधव ही मोठ्या भक्तीभावाने सामील झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव ते पंढरपूर चालत बौद्ध बांधवांनी वारी केली आहे. खांद्यावर पंचशील ध्वज आणि भगवी पताका घेऊन त्रिसरण पंचशील आणि विठू नामाचा जयघोष करत हे बौद्ध बांधव पंढरपुरात दाखल झाले आहेत.विठ्ठल मंदिराबाहेरील चोखामेळा पायरीजवळ विधिवत पूजा करून बौद्ध बांधवांनी पांडुरंगाच दर्शन घेऊन आषाढी एकादशी साजरी केली आहे.मागे कांही दिवसांपूर्वी पंढरपूरच विठ्ठल मंदिर हे बौद्ध विहार आहे असा दावा करण्यात आला होता.मात्र, बौद्ध बांधवांनी एकत्रितरित्या आषाढी साजरी करून एकात्मतेचा संदेश दिला आहे.