जनतेज न्युज

चिमठाणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी परिवर्तन पॅनलच्या दिनेश चौधरी यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी, धुळे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बहुचर्चित चिमठाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी परिवर्तन पॅनलचे दिनेश चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लोक नियुक्त सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे तसेच ग्रामविकास अधिकारी एस.पी.पाटील यांनी कामकाज पाहिले. गावात शांतता अबाधित रहावी तसेच गावाच्या विकासात सर्वांचा सहयोग असावा म्हणून ही निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध करण्यात आली आहे. यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामपंचायत सदस्य पॅनल प्रमुख व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले आहेत.यावेळी माजी पंचायत समिती सभापती दरबारसिंग गिरासे,डॉक्टर भरत राजपूत,सुभाष चौधरी,माजी उपसरपंच नरेंद्र पाटील, अनिल पाटील, दीपक पाटील,जगत दादा गिरासे,नाना चौधरी,सुनील वाणी, बाळू वाणी ,भाऊसाहेब गिरासे, रंजीत गिरासे, किशोर बागुल,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.