प्रतिनिधी, जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीचे मतदान उद्या दिनांक 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी आज साहित्य वाटप करण्यात येत आहे. 12 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत चोपडा तालुक्यातील पाच ठिकाणी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अडावद गट, गोरगावले गट, चोपडा गट, हातेड गट आणि चहार्डी या पाच ही ठिकाणी मतदान केंद्र आहेत. चोपडा येथे सहावे मतदान केंद्र आहे. केंद्राध्यक्षसह म्हणून 175 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उद्या सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. या मतदानासाठी 15,107 मतदार मतदानाच्या हक्क बजावणार आहे. तर आनंदराज पॅलेस या ठिकाणी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी सांगितले.
