जनतेज न्युज

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

प्रतिनिधी , पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुण्याच्या हवेली तालुक्यातील पिंपळे गुरव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली तसेच जगताप कुटुंबियांचे सांत्वन केले. अजित पवार यांनी यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबतची वाटचाल तसेच त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळाही दिला.