जनतेज न्युज

घरफोडी करणाऱ्या आरोपीस सीसीटीव्हीच्या आधारे केली अटक ; विष्णुनगर पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : डोंबिवली पाश्चिमेत राहणारे प्रकाश शिंपी हे कुटूंबासोबत खरेदीसाठी दादर याठिकाणी गेले होते.संध्याकाळच्या सुमारास घरी परतल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसला व ग्रील देखील तुटल्याल्या अवस्थेत होती तसेच कपाटातील सामान पाहिले असता कपाटातील २७ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्याचा लक्षात आले.यासंबंधी त्याने विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली असता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, यांनी सीसीटीव्ही च्या आधारे तपास सुरू केला असता.आरोपी हाजीमलंग रोड परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलीस शीपाई कुंदन भामरे यांना मिळाली.विष्णुनगर पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचत आरोपी विष्णू भांडेकर आणि शंकर पवार या दोघांना अटक केली.तसेच पोलिसांनी आरोपींनकडून ९० हजार किंमतीची मोटारसायकल,३ लाख ४२ हजार किंमतीचे १३२ ग्रॅम वजनाचे दागिने तसेच ३९ हजार रोख रक्कम असा एकूण ४ लाख ७१ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.