जनतेज न्युज

कामोठे येथील इमारतीचा भाग पडून एकाचा मृत्यू

प्रतिनिधी, मुंबई : कामोठे वसाहतीमधील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या एका इमारतीच्या तोडकामा दरम्यान झालेल्या अपघातात एका पोकलेन चालकाचा मृत्यू झाला आहे.
कामोठे वसाहतीमधील सेक्टर 35 येथे असलेली ब्लु हेवन ही इमारत राहण्यासाठी धोकादायक ठरवण्यात आली होती. पालिकेने दिलेल्या नोटीसीनंतर या इमारतीच्या पाडकामाची कारवाई विकसकाकडून सुरु होती. या कामादरम्यान आज संध्याकाळी घडलेल्या दुर्घटनेत एका पोकलेन चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,घडलेल्या प्रकाराचा तपास पोलीस करत आहेत.