जनतेज न्युज

क्रूरकर्मा औरंगजेबाचे नाव पुसले गेले म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला जल्लोष

प्रतिनिधी, औरंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव करण्याला शिक्का मुहूर्त केल्यानंतर शहरांमध्ये सर्वच पक्षाकडून जल्लोष साजरा करणे सुरू आहे. यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील जल्लोष साजरा केला. यावेळी मनसे अध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले की, आज हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे ज्या क्रूरकर्मा औरंगजेबाने आमच्या राजांना त्रास दिला. चाळीस दिवस त्यांची नख सतत काढत राहिला होता. या यातना त्याने दिल्या होत्या त्याचं नाव पुसणं गरजेचं होतं. ते पुसल्या गेलं या संभाजीनगरच्या जनतेच्या मनातील इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. आणि आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी जल्लोष साजरा करताना दिली आहे.