प्रतिनिधी, औरंगाबाद : मध्यवर्ती बस स्थानकाचे आघाडी व्यवस्थापक संतोष घाणे यांनी माहिती दिली की. आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांसाठी पंढरपूरला सोडण्यात आलेल्या बसमध्ये यावर्षी एसटी महामंडळाला 28 लाखाचा नफा झाल्याची माहिती आज रोजी देण्यात आली आहे, यावेळी मध्यवर्ती बस स्थानकातून विशेष व्यवस्था करण्यात आली होती एसटी महामंडळाच्या बसने 71 हजार किलोमीटरचा प्रवास करण्यात आला असून त्या माध्यमातून एसटी महामंडळाला 28 लाखाचा नफा झाला आहे. कोरोना संसर्ग मुळे पंढरपूर यात्रा दोन वर्ष बंद असल्याने एसटी महामंडळाचा मोठे नुकसान झाले होते. मात्र यावर्षी शासनाने परवानगी दिल्याने पंढरपूरची यात्रा संपन्न झाली असून सदरील पंढरपूर यात्रेसाठी मध्यवर्ती बस स्थानकातून सोडण्यात आलेल्या बसेस मधून मोठा फायदा एसटी महामंडळात झाल्याची माहिती आज रोजी देण्यात आली आहे.
