प्रतिनिधी, मुंबई : खेतवाडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आठवी गल्लीतील महागणपती म्हणून ओळखला जाणारा 35 फुटाचा विनायक देवी गणपती आहे खेतवाडी येथील मुंबईचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुंबईचा महागणपती या गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी विनायक देवी अवतारामध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. ही मूर्ती 35 फुटाची असल्याची माहिती येतील मंडळाच्या सेक्रेटरी निलेश श्रीधनकर यांनी दिली आहे. या मंडळाचे हे 59 वे वर्ष आहे. मुंबईचा महागणपती म्हणून प्रसिद्ध आहे या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी सामाजिक संदेश देण्याकरीता पौराणिक कथेवर भार देऊन समाज प्रबोधनाचे काम करतो आहे. विनायका देवी गणपतीचा अवतार आहे. यामध्ये आम्ही स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडी आठवी गल्ली देण्याचा प्रयत्न करत आहोत. स्त्री शक्ती याद्वारे आम्ही प्रेक्षकांना दाखवण्याचा काम करत आहोत. आम्ही प्रेक्षकांना एका व्हिडिओ द्वारे या गणपतीचा अवताराची माहिती देत आहोत जेणेकरून जनजागृती हा गणपती कशाप्रकारे किंवा यांचा अवतार कसा झाला हे समजवण्याचा साठी त्यांना व्हिडिओद्वारे येथे दाखवण्यात येत आहे. या गणपतीची वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे त्या दृष्टीने पुरुष आणि स्त्री समानतेचा संदेश देण्यासाठी स्त्रीरुपी गणपतीची मूर्ती उभारण्यात आलेली आहे. ही मूर्ती गणेश वराडे यांनी जाग्यावरच बनवलेली आहे. आम्ही आमच्या मंडळातर्फे महापालिकेच्या शाळेतील मुलांची सहल काढून त्यांना शैक्षणिक विविध वस्तू आम्ही आमच्या मंडळाकडून देण्याची करत असतो असे निलेश श्रीधरकर यांनी म्हटले आहे
