प्रतिनिधी, सांगली : पुरोगामी संघटना यांच्या वतीने महापुरुष यांचे बद्दल अपशब्द वापरणारे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंग कोसारी, सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड यांचे विरोधात सांगली बंद ठेवण्यात आली आहे. तर यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच सांगलीच्या स्टेशन चौकातून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ही पदयात्रा सांगली शहरातून फिरून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन महापुरुषांच्या पुतळ्याला हार ही घालून अभिवादन करण्यात येणार आहे.
