जनतेज न्युज

महाराष्ट्रातील एकमेव भारत माता मंदिरात 100 पेक्षा जास्त क्रांतिकारकांचे फोटो सहित इतिहास

 
प्रतिनिधी, औरंगाबाद : ऑगस्ट क्रांती दिन आज औरंगाबाद शहरातील भारत माता मंदिरातील क्रांतिकारक यांना करण्यात आले अभिवादन भारत माता मंदिर हे एकमेव मंदिर आहे यामध्ये क्रांतिवीरांची माहिती लावलेली आहे याची माहिती नवीन पिढीला माहिती व्हावी आपल्या देशासाठी बलिदान देण्याचा पूर्ण इतिहास आहे.भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष झाले त्यावेळेस महापालिकेच्या वतीने भारत माता मंदिर उघडले या मंदिरामध्ये शंभर क्रांतिकारकांचे फोटो त्यांचा जन्म कधी झाला आणि त्यांना कुठल्या स्वातंत्र्यासाठी कश्यामुळे शिक्षा झाली तू इतिहास व मंदिरामध्ये संक्षिप्त माहिती दिलेली आहे आणि येणाऱ्या लोकांना क्रांतिकारकांची माहिती व्हावी यासाठी या मंदिराची उभारणी केल्याची माहिती माझी उपमहापौर संजय जोशी यांनी दिली आहे
 
आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन या निमित्ताने भारत माता मंदिरांमध्ये दरवर्षी पूजन केले जाते ज्या क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा झाली होती आणि याच क्रांतीकारकांना तोफेच्या तोंडी देण्यात आले होते त्यांचा फोटो सहित त्यांनी केलेल्या कामगिरीचा इतिहास लिहिला आहे.जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला या क्रांतिकारकांचा इतिहास कळेल याकरता या मंदिराची उभारणी केलेली आहे शंभर क्रांतिवीरांची माहिती देणारे एकमेव भारत माता चे मंदिर ऐतिहासिक औरंगाबाद शहरात आहे ज्यांचा उल्लेख कुठे नाही असे बलिदान देणाऱ्यांची सविस्तर माहिती आहे असे माजी उपमहापौर साधनाताई सुरडकर म्हणाल्या