जनतेज न्युज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती वरून मुंबईकडे रवाना

प्रतिनिधी , अमरावती : महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सहा दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर होते या दरम्यान त्यांनी नागपूर, चंद्रपूर व अमरावती जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यावर दरम्यान त्यांनी महत्त्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला, विदर्भामध्ये मनसेची ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरे यांचा हा महत्त्वाचा दौरा होता, तीन दिवस राज ठाकरे यांनी अमरावतीमध्ये पश्चिम विदर्भातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी बंद द्वार सुद्धा चर्चा केली, अमरावती राज ठाकरे यांच्या कालच्या मेळाव्याला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला,आणि सहा दिवसाचा दौरा आटपून राज ठाकरे हे अमरावती रेल्वे स्थानकावरून रात्री ७वाजता अंबा एक्सप्रेसने मुंबईसाठी रवाना होणार आहे,12 तासाच्या प्रवासा नंतर राज ठाकरे उद्या सकाळी सात वाजता मुंबईत दाखल होणार आहे, सहा दिवसाच्या राज ठाकरेंच्या दौऱ्यात आगामी निवडणुकीत मनसे खरचं उभारी घेणार का ? हे पहाव लागेल मात्र जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आल्याने मनसैनिकांमध्ये मोठा जोश भरलेला होता.