प्रतिनिधी , जळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा आणि शिवसेना हे नाव आगामी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वापरण्यास घातलेल्या बंदीच्या निर्णयावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय तात्पुरता असला तरी दोन्ही गट नवीन चिन्हासाठी कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज आमदारांचे तसेच खासदारांची बैठक होत असे गुलाबराव पाटील म्हणाले. नवीन चिन्ह घेण्यासाठीच ही बैठक असावी असा दुजोरा सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
