जनतेज न्युज

MSEB च्या नावाने बिल भरण्या साठी फोन आल्यास सावधान, आपल अकाउंट होईल खाली

प्रथिनिधी, ठाणे : करोडो रुपयांची लॉटरी लागली आहे, आपल डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंध होणार आहे, ऑनलाईन शॉपिंग या सगळ्या युक्त्या आता जुन्या झाल्या असून ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांनी आता नवीन युक्ती शोधून काढली आहे, हे फ्रॉड करणारे लोक पहिले आपण MSEB चे बिल भरले नसल्याचे मेसेज पाठवतात व त्या मेसेज मध्ये आपला नंबर पाठवतात, व नंतर फोन करून बिल भरलेलं असून सुद्धा आपण बिल भरलेलं नसल्याची बतावणी करतात, व बिल अपडेट करण्यासाठी 20 रुपये भरण्यास सांगुन एक ऍप डाउनलोड करायला सांगुन आपल्या अकाउंट मध्ये जितके पैसे असतील तेवढे काढून घेतात, तरी सर्व नागरिकांनी अशा फ्रॉड लोकांपासून सावधान राहावे कारण अशी फसवणूक लोकमान्य नगर येथील राजेश शेटे यांच्या बाबतीत झाली आहे,आणि त्या बद्दलवर्तक नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हाही दाखल झाला आहे,या बद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अशा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांपासून नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे, कुठल्याही प्रायव्हेट फोन वरून असे कॉल आल्यास अशा कॉल वर विश्वास ठेवू नये, कुठलेही ऍप डाउनलोड करू नये, कोणालाही आपल्या अकाउंट बद्दल माहिती देऊ नये.