जनतेज न्युज

विनायक मेटे यांच्या अपघाताची एसआयटीकडून चौकशी करा – राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख

प्रतिनिधी, बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर, त्यांचा घात की अपघात? असा संशय कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलाय. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी, या प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केली आहे. त्याचबरोबर स्व. विनायकराव मेटे यांच्या आईने एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर, त्या बातमीवर आक्षेपहार्य पोस्ट करणाऱ्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक गजानन खमीतकर यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. अपघाता विषयी नेमकं काय म्हणालेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख पाहुयात.