जनतेज न्युज

पनवेलमध्ये किरीट सोमय्यांनी गरबा प्रेमीसह धरला ठेका

प्रतिनिधी, मुंबई : रंगमंचावर जाऊन किरीट सोमय्यांनी वाजवला ड्रमसेट. आमदार प्रशांत ठाकुर यांच्यासह किरीट सोमय्यांनी पनवेलच्या गरबा प्रेमींसह केले नृत्य. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या हे काल रात्री पनवेलमध्ये मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या झंकार नवरात्रोत्सव मध्ये आले होते.दोन वर्षांनंतर सर्व गरबाप्रेमींचा उत्साह पाहून किरीट सोमैय्या यांना सुद्धा गरब्याच्या तालावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. यावेळी त्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,यांच्यासह पनवेलच्या गरबा रसिकांसमवेत गरबा नृत्य केले.एवढ्यावरच किरीट सोमय्या थांबले नसून त्यांनी रंगमंचावर येऊन एक्स्प्रेस दांडियाच्या पूर्ण बँड सोबत ड्रमसेट वाजवण्याचाही मनमुराद आनंद लुटला.यावेळी त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आयोजनाचे तोंड भरून कौतुक करून गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव देखील तितक्याच उत्साहाने साजरा करीत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.