जनतेज न्युज

फटाके न फोडता विकासाचे नारळ फोडून आ. माधवराव जवळगावकरांनी केली विकास कामांची सुरुवात

प्रतिनिधी, नांदेड :  शहरात आज सकाळी दीपावली निमित्त हदगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या वायु प्रदूषण रोखण्यासाठी फटाके न फोडण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील नडवा नाली व रस्ता बांधकाम व उमर चौक पारडी सिमेंट रोडचे बांधकाम मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होते हा शहरातील सर्वात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आज आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दीपावलीच्या दिवशी मार्गी लावला. येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. याच रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज फटाके न फोडता विकासाचे नारळ फोडून नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी विकासाची दिवाळी केली असल्याचे मत शहरातील अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.