जनतेज न्युज

फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक प्रकारचे फुल येत असतात त्याफुलांमध्ये जास्त लागणारे झेंडूचे फुल व गुलाबाचे फुलच असतात मात्र याच फुलांची आवक जास्त व मागणी कम अशी असल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये फुलांची व्यापारी असतात त्यांच्याकडूनच सर्व फुल विक्रेता फुल घेत असतात मात्र यावर्षी फुलांची अवाक जास्त व मागणी कमी तसेच यंदा पाऊस ही जास्त असल्याने शेतकरी व व्यापारी दोन्हीचे ही नुकसान होत आहे. झेंडूचे फुल १०० ते १५० रुपये किलो विक्री केले जात होते त्याच फुलाला आता १० रुपये किलोने ही कोणी खरेदी करण्यासाठी येत नाही. फुल साठवून ठेवणारी वस्तू ही नाही त्यामुळे खूप नुकसान होत असल्याची भावना यावेळी व्यापाऱ्यांनी दिली.