जनतेज न्युज

ॲट्रॉसिटी प्रकरणांमध्ये सहाय्य पोलीस आयुक्त विश्रामबाग यांना पाहिजे असलेला आरोपी सावरकर भवन मध्ये…

प्रतिनिधी , पुणे / विजय लोणक : पुणे महानगरपालिकेच्या एलबीटी कार्यालय जवळील चर्मकार समाजाच्या गटई कामगाराला दर महिना दोन हजार रुपयाची खंडणी मागून खंडणी न दिल्याप्रकरणी त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना जातीच्या संदर्भामध्ये हिनकसपणे बोलून त्यांचा अपमान, अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे रमेश विष्णू खामकर याचे विरुद्ध ॲट्रॉसिटी व खंडणी खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याचा तपास साहाय्य पोलीस आयुक्त विश्रामबाग करीत आहेत. याबाबत सहाय्य पोलीस आयुक्त विश्रामबाग यांनी आमचा तपास सुरू असून संबंधित पाहिजे आरोपी फरार असल्याची माहिती पुणे क्राईम न्यूज ला दिलेली आहे . आज पुणे क्राईम न्यूज चे प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेच्या सावरकर भवन मध्ये आले असता सावरकर भावांच्या चौथ्या मजल्यावर रमेश विष्णू खामकर हा खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्ता येथे आढळून आला , तसेच पुणे महानगरपालिकेचे काही माजी नगरसेवक अधिकारी व कर्मचाऱ्यांशी टेबलवर चर्चा करत असताना दिसून आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या सावरकर भवन मध्ये खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश खामकर सावरकर भवन च्या चौथ्या मजल्यावर दिसून आल्याने काही सजग नागरिकांनी पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत कळविले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग यांना पाहिजे असलेला आरोपी हा त्यांच्याच हद्दीत फिरत असताना देखील शिवाजीनगर पोलीस स्टेशन सहित अन्य कोणत्याही पोलिसांना तो कसा दिसून येत नाही याबाबत अनेक प्रश्न आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत .

ॲट्रॉसिटी प्रकरणातील पाहिजे असलेला आरोपी रमेश खामकर याला वाचवण्याचे पोलिसांचे प्रयत्न
चर्मकार समाजातील गटई कामगाराला दरमहा दोन हजार रुपये दे अशी खंडणी मागून धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा मानसिक छळ केल्याप्रकरणी रमेश खामकर यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे .याबाबतचा तपास सहाय्य पोलीस आयुक्त विश्रामबाग करीत आहेत. श्री खामकर यांनी पुणे सत्र न्यायालयामध्ये ॲट्रॉसिटी प्रकरणातून वाचण्याकरता जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला असून तो मागील चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. याबाबत फिर्यादी यांचे वकील श्री एडवोकेट अंबादास बनसोडे यांनी सांगितलं की रमेश खामकर यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जातील एक्झिट वन ची कॉपी तसेच पोलीस तपासाची कॉपी मागील 14 कोर्ट तारखांना आम्हाला देण्यात आले नाही . त्यामुळे याबाबतचा से किंवा आमचं म्हणणं आम्ही सादर करू शकलो नाही. याबाबत एडवोकेट अंबादास बनसोडे यांनी काही शंका व्यक्त केल्या असून पोलीस ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश खामकर यांना वाचवण्याचा हा प्रकार असल्याचे दिसून येत आहे . तसेच प्रसंगी पोलिसांकडून बी समरी रिपोर्ट पाठवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी शंका ही त्यांनी व्यक्त केली आहे .
विश्रामबाग पोलिसांना पाहिजे आरोपी आढळून येत नाही माननीय सत्र न्यायालयामध्ये देखील एक्झिट वन कॉची कॉपी पोलीस तपासाची कॉपी अद्यापर्यंत देण्यात आलेले नाही. त्या कारणामुळे फिर्यादी यांना त्यांचं म्हणणं सादर करता आलेला नाही अशा परिस्थितीमध्ये खामकर यांना शासन स्तरावरून वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.