प्रतिनिधी, चंद्रपूर : आगामी निवडणुका आणि पक्ष संघटनेची मोठ बांधण्याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.सोमवारला सायंकाळच्या सुमारास ते चंद्रपूर शहरात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्याकडून त्यांचे जोरदार जंगी स्वागत करण्यात आले. यादरम्यान राज ठाकरे यांनी शहरातील एन.डी. हॉटेल येथील केक शॉपी येथे जाऊन स्वखर्चाने चार केक खरेदी केले. आणि हॉटेलमधील रूमच्या दिशेने निघाले. अचानक चार केक खरेदी करण्याचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला असता, केक खरेदी करण्याचं काही विशेष कारण नसल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे चंद्रपुरात मुक्कामी असून आज सकाळी ते स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते पुढे अमरावती दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
