प्रतिनिधी , अहमदनगर : राज्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या आहेत तसेच निकाल जाहीर झाला आहे. संगमनेर तालुक्यातील जवळजवळ 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडला यामध्ये संगमनेर तालुक्यात थोरात विरुद्ध विखे असा सरळ संघर्ष बघायला मिळाला आहे त्यामुळे 11 ग्रामपंचायतीवर विखे गटाने वर्चस्व प्रस्थापित केला आहे. तर 26 ग्रामपंचायत काँग्रेस पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा दबदबा असल्याचे बघायला मिळत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांनी अतिशय ढोल ताशाच्या गजरात निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे जंगी स्वागत करत लोकशाहीतील निवडणुकीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत विखे विरोधक थोरात असा संघर्ष संगणमेर तालुक्यात सुद्धा बघायला मिळेल हे मात्र नक्कीच.
