जनतेज न्युज

सकल हिंदू समाजाचा पैठण गेट येथुन निघाला मूक मोर्चा

प्रतिनिधी, औरंगाबाद :  शहरातील पैठण गेट परिसरातून सकल हिंदू समाजाचा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा देशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्या याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला असून,गेल्या काही दिवसांमध्ये इस्लामी जिहादच्या नावाखाली हिंदूंची हत्या करण्यात येत आहे यात विदर्भातील उमेश कोल्हे, उदयपूरचा टेलर, यांच्या गळा चिरून हत्या करण्यात आले असून हिंदूंवरती होणारे अत्याचार थांबवण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज रोजी करण्यात आली आहे. मूक मोर्चा च्या माध्यमातून हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्यात आला आहे.औरंगाबाद शहराचे नामांतर ची घोषणा होताच औरंगाबाद शहरात सुद्धा हिंदूंवरती हल्ले होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या सर्व घटना थांबवण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज रोजी मूक मोर्चा च्या माध्यमातून करण्यात आली आहे.हा मोर्चा पैठण गेट येथुन औरंगपुरा महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत येऊन तेथे सभेत रूपांतर झाले  सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

हा मोर्चा आज रोजी शहरात संपन्न झाला आहे.