प्रतिनिधी, सांगली : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार आज संपन्न झाला आहे.
गेली अडीच वर्षे राज्यातील विकासाला खीळ बसलेली होती या मंत्रिमंडळ विस्तारामुळे महाराष्ट्रातील विकासाला चालना मिळेल. या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री जोमाने कामाला लागतील. महाराष्ट्रात सत्ता बदल व्हावा ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती ती इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे. मला आत्मविश्वास आहे की राज्यातील शेतकरी, शेतमजूर व बाराबलुतेदार या सगळ्यांना योग्य प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम भाजप - शिवसेनेचे सरकार करेल याचा मला विश्वास आहे.
सर्व घटकपक्षांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी यांनी घटक पक्षांना मंत्रीपदे व आमदारकी देऊन घटकपक्षांना योग्य न्याय दिला होता. यावेळी सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन काम करेल त्यामुळे कोणताही घटकपक्ष नाराज होण्याचे कारण नाही आहे कारण आज राज्यामध्ये आमचं सरकार आलेलं आहे या सत्तेच्या माध्यमातून आम्हाला जनतेचा विकास साधायचा आहे आणि आम्ही निश्चितपणे ते काम करू हा आम्हाला विश्वास आहे...
