प्रतिनिधी, सांगली : गणपती पाठोपाठ आज तिसऱ्या दिवशी गौराईचे आगमन झाले. वाजत गाजत सुवासिनी महिलांनी गौराईचे स्वागत केले. यावेळी गौराईच्या आगमनाने भाराऊन गेल्या होत्या. सुवासिनींनी पारंपरिक वेशभूषेत कृष्णेच्या पात्रामधून गौराईचे स्वागत केले. गौरी हा सुवासिनी महिलांचा आवडता क्षण असतो. त्यामुळे गौराईच्या आगमनाच्या क्षणाची महिला आतुरतेने वाट पहात असतात. गणपती देवाची प्रतिष्ठापना केल्यानंतर तिसर्या किंवा चौथ्या दिवसी गौराईचे आगमन होते. त्या पद्धतीने आज तिसऱ्या दिवशी गौरी आगमन आले आहे. आज गौराईच्या आगमनासाठी आणि गौरी पूजनासाठी महिलांनी कृष्णा नदी घाटावर गर्दी केली होती यावेळी महिलांनी गौरी पूजन करीत झिम्मा फुगडीचा फेराही धरला. पुढील दोन दिवस या गौराई घरोघरी गणपती शेजारी प्रतिष्ठापित होणार असून एका पाहुणीप्रमाणे महिलावर्ग गौराईचा पाहुणचार करतात.
