प्रतिनिधी, अहमदनगर : ज्या सफाई कामगाराने कोरोना महामारी काळात संगमनेरचे बस स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी आहोरात्र काम केले. त्या सफाई कामगाराला कामावरून काढून टाकण्याचे काम बसस्थानक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राजेंद्र लक्षम जमधाडे त्यांना कोणतीही माहिती न देता कामावरून काढण्यात आले आहे. यामुळे आता कामगाराला पुन्हा कामावर रुजू कऱण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिश कानवडे यांच्या नेत्वृत्वात संगमनेर बस आगारप्रमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
