प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : कल्याण पश्चिम मधील मोरया स्वीट दुकानदार कॅमेरा फिरवत चोरांनी चोरी केल्याची घटना घडली होती या चोरीचा तपास करत महात्मा फुले पोलीसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोहंमंद करीम उर्फ लाडो अख्तरअली बागवान या दोन आरोपीला अटक करत 7 हजार रुपये हस्तगत करत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने आपला साथीदार साकीर खान सह मिळून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिर्ला कॉलेज परिसरात 7 घरफोडी करत 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच अर्धा किलो वजनाची चांदीची भांडी असे आठ लाखाचा माल चोरी केल्याची कबुली दिली.त्या नुसार महात्मा फुले पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकत तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगर असून त्यांच्यावर अंबरनाथ, बदलापूर, विक्रोळी, मध्यवर्ती, महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकुण 9 गुन्हे दाखल आहेत . यापैकी 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. हे तिन्ही आरोपी 20 वर्षांचे असून मोहम्मद हा उल्हासनगर , साकीर हा कल्याण तर शिवम हा अंबरनाथ येथे राहतो. या आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्कुटी ,कटावणी व घर पुढे केलेल्या आठ लाखाचा माल हस्तगत केला आहे
