जनतेज न्युज

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी, बीड : विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न घेऊन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स पासून मोर्चास सुरवात झाली त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला आहे.एक ऑगस्ट पासून ऑल इंडिया जत्थाची सुरुवात काश्मीर पासून करण्यात आली. आज हीच जत्था यात्रा बीडमध्ये दाखल झाली असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. यात्रेचं नेतृत्व एसएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष बीपी करत आहेत. देशभरात पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या भागात ही यात्रा जात आहे. आज बीडमध्ये निघालेल्या मोर्चातून ऊसतोड कामगार मुलांचे वस्तीगृह तालुका पातळीवर सुरू करण्यात यावं, त्याबरोबरच थकीत शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.