प्रतिनिधी, बुलडाणा : महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नाबाबतची राष्ट्रवादी कॉग्रेसची जनजागरण यात्रा राज्यात काढण्यात आली आहे.. देशातील सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांना विकणे, बेरोजगारी या मुद्यांवरून विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे.. गौतम अदाणीच्या प्रकरणावरून मोदी सरकारची कोंडी करण्याचे त्यांचे प्रयत्न आहे. राष्ट्रवादीची जनजागरण यात्रा शुक्रवारी बुलडाणा जिल्ह्यात पोहोचली आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी सभा झाल्या. 24 फेब्रुवारी पासून सिंदखेडराजा येथून या यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.आज बुलढाणा शहरात यात्रा दाखल होतात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी मोटर सायकल चालवत मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला आहे..महागाई कमी झाली पाहिजे.. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे अशा घोषणा करत ही रॅली बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात पोहोचली होती.
